चिखलीतील एमआयडीसी परिसरात भीषण आग; दुकानातील पत्रावळी व द्रोण साहित्य जळून खाक 

चिखली : येथील एमआयडीसी परिसरातील पत्रावळी व द्रोण साहित्य तयार करण्याच्या दुकानात अचानकपणे भीषण आग लागली. यामध्ये, अनेक साहित्य जळून खाक झाले असून दुकान मालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

चिखली : येथील एमआयडीसी परिसरातील पत्रावळी व द्रोण साहित्य तयार करण्याच्या दुकानात अचानकपणे भीषण आग लागली. यामध्ये, अनेक साहित्य जळून खाक झाले असून दुकान मालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही घटना २० मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. 

चिखली येथील एमआयडीसी परिसरात नागवाणी इंडस्ट्रीज नावाने पत्रावळी व द्रोण साहित्य तयार बनविण्याची कंपनी आहे.  बुधवारी मध्यरात्री दुकानात अचानकपणे आग लागल्याने सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच, चिखली आणि बुलढाणा येथील नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे जवान  घटनास्थळी दाखल झाले होते. सर्वप्रथम अग्निशमन वाहनाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. यानंतर,  प्रवीण जाधव, राहुल गवळी, पांडुरंग सोळंकी, तुषार गवई, शेख इस्माईल, अनुप खरे, सागर गवळी आणि इतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या अथक मेहनतीमुळे आग विझवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत आगीमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आग  लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधित विभागांकडून यासंदर्भात तपास सुरू आहे. ही घटना संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासाठी एक धक्कादायक मानली जात असून नागवाणी इंडस्ट्रीजचे मालक चेतन नागवाणी यांना आर्थिक फटका बसला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »