dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली; रूग्णालयात दाखल

छत्रपती संभाजीनगर :  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली.  जालना येथून बीडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना  रस्त्यात भोवळ आल्याने त्यांचा दौरा तातडीने रद्द करण्यात आला.  छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात ते दाखल असून  त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.

या रुग्णालयाचे संचालक डॉ. विनोद चावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांना उष्माघात (सनस्ट्रोक) आणि अतिसाराचा त्रास झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्या प्रकृतीची परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या मराठवाड्यात तापमानाने उच्चांक गाठला असून, काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या तीव्र उष्णतेचा फटका मनोज जरांगे पाटील यांनाही बसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सतत बैठका घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top