Lok Sabha Election 2024: परस्पर विरोधी उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि कुटुंब

Lok Sabha Election 2024: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर :  राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या ११ लोकसभा मतदारसंघामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यासोबतच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील सिडको येथील किलबिल शाळा मतदन केंद्र क्र.२५९ येथे कमल त्रिंबक घायाळ या ८५ वर्षे वयाच्या आजींनी व्हिलचेअरवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. सध्या मतदान सुरळीत सुरु असून, मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मतदानाच्या सकाळी ८ ते ९ दरम्यान वयोवृद्ध नागरिकांसह तरुणाई मोठ्या प्रमाणावर मतदान करताना दिसून आली.

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि कुटुंब
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि कुटुंब

खैरेंनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शारदा मंदीर शाळा, एसबी कॉलनी येथील मतदान केंद्रात कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

 

 

 

 

 

इम्तियाज जलील आणि कुटुंब
इम्तियाज जलील आणि कुटुंब

इम्तियाज जलील यांनीही केले मतदान

छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनाही मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »