बुलढाणा: संविधानाला अभिप्रेत असलेली समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभाव ही भूमिका काँग्रेसने आजवर समर्थपणे जपली आहे. काँग्रेस पक्षामुळे देश एकसंध राहिला तर महायुतीच्या राजकारणामुळे हुकुमशाही, द्वेष, विभाजन आणि जातीय संघर्षाला खतपाणी मिळत आहे. बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुशासन, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विचारांची गरज आहे.

बुलढाणा: संविधानाला अभिप्रेत असलेली समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभाव ही भूमिका काँग्रेसने आजवर समर्थपणे जपली आहे. काँग्रेस पक्षामुळे देश एकसंध राहिला तर महायुतीच्या राजकारणामुळे हुकुमशाही, द्वेष, विभाजन आणि जातीय संघर्षाला खतपाणी मिळत आहे. बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुशासन, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विचारांची गरज आहे. ही विचारधारा महाविकास आघाडी राबवत असून सौ. लक्ष्मी दत्ता काकस या सक्षम, समर्पित आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या बळावर बुलढाणा भय आणि भ्रष्टाचार मुक्त घडेल, असा मला ठाम विश्वास, असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू संदेशजी आंबेडकर साहेब म्हणाले.
शनिवार 29 नोव्हेंबर रोजी बुलढाणा शहरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.बुलढाणेकरांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून लोकशाहीवादी प्रशासनाला बळ द्यावे, असे आवाहनही संदेश आंबेडकर यांनी केले आहे. यावेळी आमदार धीरज लिंगाडे, दिलीपभाऊ जाधव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मीताई काकस, सतीश महेंद्र, प्रतीक जाधव,दीपक रिंढे,दत्ता काकस, यशवर्धन सपकाळ, शिवाजीराव देशमुख व महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदेशजी आंबेडकर म्हणाले की, बुलढाणा शहरात आज भीती, पक्षांतर, मतभेद यामुळे नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. या सर्व गोष्टींना फाटा देऊन शहराला विकासाच्या निर्णायक मार्गावर आणण्याची गरज आहे. हे कार्य सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातूनच शक्य आहे. महाविकास आघाडी पारदर्शक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक प्रशासन देईल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.शहराचे राजकारण काही मोजक्या लोकांच्या हातात न राहता ते थेट नागरिकांच्या हितासाठी चालले पाहिजे. लक्ष्मीताईंनी आजवर समाजकार्यातून दाखवलेली निष्ठा आणि प्रामाणिकता पाहता बुलढाण्याच्या नगराध्यक्षपदी त्या बसल्या तर एक नवा आदर्श निर्माण होईल. बुलढाणा भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासमुखी होईल, असेही संदेश आंबेडकर म्हणाले.
वडीलांसाठी कधी मत मागितले नाही पण दत्ताभाऊंसाठी मागतोय : यशवर्धन सपकाळ
घरातील कोणी उभे राहिले, की संपूर्ण परिवार प्रचारात सहभागी होत असतो. वडील विधानसभेला उभे होते तेव्हा कधी प्रचारात उतरलो नाही. कारण राजकारणात आम्हाला घराणेशाही आणायची नाही. मात्र दत्ताभाऊंचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. त्यांना यावेळेस न्याय मिळणे खूप आवश्यक आहे. यासाठी बुलढाणेकरांना मते मागतोय. बुलढाणेकरांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन यशवर्धन सपकाळ यांनी केले.
