शिर्ला डॅमवर बिबट्याचे दर्शन,  खामगाव शहराचा पाणीपुरवठा प्रभावित

खामगाव – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्ला डॅम परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पाणीपुरवठा विभागास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून डॅम परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने कर्मचारी डॅमवर जाण्यास घाबरत आहेत.

खामगाव – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्ला डॅम परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पाणीपुरवठा विभागास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून डॅम परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने कर्मचारी डॅमवर जाण्यास घाबरत आहेत. या परिस्थितीमुळे शिर्ला डॅमवरून शेलोडी आणि रावण टेकडी पाण्याच्या टाकीवरून सुरु असलेला पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. याआधी गेरू माटरगाव धरणावरही बिबट्याचा वावर आढळला होता. त्यानंतर आता शिर्ला डॅमवर हीच समस्या उभी राहिली आहे. नगरपालिकेने वनविभागाशी पत्रव्यवहार करत बिबट्याच्या अधिवासाचा शोध घेण्याची विनंती केली आहे. घाबरत शिर्ला डॅम परिसरात बिबट्यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी सुरक्षिततेच्या कारणास्तव कामावर जाण्यास आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा इशारा पालिकेकडून दिला जात आहे. पालिका प्रशासन नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थापनात सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे. वनविभाग आणि नगरपालिका प्रशासन एकत्र येऊन या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याची तयारी करत आहेत. नागरिकांनी डॅम परिसरात जाऊ नये, तसेच बिबटचाच्या हल्ल्यापासून बचावासाठी दक्ष राहावे, असे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »