dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मलकापूर तालुक्यातील निमखेड  शिवारात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला 

मलकापूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी बिबट आणि मानवी संघर्षाच्या घटना वाढत चालल्या असून खामगाव, नांदुरा तालुक्यातील निमगाव सह आता मलकापूर तालुक्यातील निमखेड शिवारातही एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना 19 जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. 

तालुक्यातील निमखेड परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून १९ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान शेतकरी नितीन सुरेश मालठाणे रा. पिंपळखुटा बुद्रुक  हे शेतामध्ये काम करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात शेतकरी नितीन मालथाने हे गंभीर स्वरूपाने जखमी झाले असून नितीन मालठाणे यांनी आरडाओरोड केल्याने शेजारी शेतातील नागरिकांनी धाव घेतल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी नितीन मालठाणे यांच्या कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून बिबट्याच्या हल्ल्यात बिबट्याचा  एक दात त्यांच्या पायामध्ये तुटून रुतल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याबाबत मोताळा वन्यजीव विभागास माहिती वन विभागाच्या पथकाने निमखेडी शिवारात धाव घेऊन बिबट्याचा शोध सुरु केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top