Jalna constituency vote counting: बदनापुरात नारायण कुचे करणार विजयाची हॅट्ट्रिक?,तेराव्या फेरीअखेर 22 हजार मतांच्या आघाडीवर

Jalna constituency vote counting

Jalna constituency vote counting: जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण कुचे सलग तिसर्‍यांदा विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत.

Jalna constituency vote counting

जालना :  जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण कुचे सलग तिसर्‍यांदा विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. त्यांच्याविरुद्ध तिसर्‍यांदा निवडणुकीत उभे असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बबलू चौधरी यांना तिसर्‍या वेळेस देखील पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.
नारायण कुचे यांनी तेराव्या फेरीत 68 हजार 417 मते मिळवली असून चौधरी यांना 45 हजार 982 मते मिळाली आहेत. कुचे यांनी तब्बल 22 हजार 435 मतांची आघाडी घेतली आहे.

Jalna constituency vote counting
या मतदारसंघात यावेळी नारायण कुचे यांना फटका बसेल असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. याशिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे फटका बसेल असेही सांगण्यात येत होते. मात, आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालावरून महायुतीने या सर्व मुद्द्यांना धक्का देत आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »