IPL 2024: पंजाबने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आणि रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा ची जोडी विजयासाठी दमदार ठरली . पंजाबचा हा या मोसमातील चौथ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला.
मुंबई: आयपीएलच्या रंगतदार सामन्यात पंजाबने गुजरातवर विजय मिळवला शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा या जोडीच्या कामगिरीने पंजाबला विजयापर्यंत पोहोचता आले.पंजाबने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आणि रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा ची जोडी विजयासाठी दमदार ठरली . पंजाबचा हा या मोसमातील चौथ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. तर गुजरातचा दुसरा पराभव ठरला.
शशांक शर्मा आणि आशुतोष शर्मा (इमपॅक्ट प्लेअर) या दोघांनी सामना पंजाबच्या बाजुने झुकवला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 43 धावांची निर्णायक भागीदारी केली. ही भागीदारीच गुजरातच्या पराभवाचं कारण ठरली. त्यानंतर आशुतोष 17 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्ससह 31 धावा करुन माघारी परतला. तर त्यानंतर शशांकने हरप्रीत ब्रार याच्यासह पंजाबला विजयापर्यंत पोहचवलं. शशांकने 29 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 61 धावांची नाबाद खेळी केली.