Baba Siddiqui murder case : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील पोलिसांकडून अकोल्यात चौकशी

Baba Siddiqui murder case

Baba Siddiqui murder case :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. शुबू लोणकर या फेसबूक अकाउऊंटवरुन पोस्ट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाला आता नवीन वळन मिळाले असून या प्रकरणी अकोला कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. जबाबदारी घेतल्याची पोस्ट शेअर केलेला शुबू हा शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास पोलीस अकोल्यात करत आहेत.

Baba Siddiqui murder case

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. शुबू लोणकर या फेसबूक अकाउऊंटवरुन पोस्ट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाला आता नवीन वळन मिळाले असून या प्रकरणी अकोला कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. जबाबदारी घेतल्याची पोस्ट शेअर केलेला शुबू हा शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास पोलीस अकोल्यात करत आहेत.

जबाबदारी घेतलेले फेसबुक पेज कोणाचे?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शुबू लोणकर या अकाउंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. शुबू लोणकर ज्यांचे हे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असल्याचे समजते. या आधीही शुभम लोणकर ला अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्टल त्याच्याकडून जप्त केल्या होत्या.

अकोल्यातील तरुण रडारवर

शुभम लोणकर संदर्भात अकोला पोलिसांना विचारले असता, आपण त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात कारवाई केल्याचं पोलिसांनी म्हटलं होते. मात्र आज फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर आणि शुभम लोणकर हाच एकच का? हे अद्याप कळू शकले नाही, त्यामुळं आपण याबद्दल जास्त सांगू शकणार नाही, अशी माहिती अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली आहे.

कोण आहे शुभम लोणकर?

लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं होते. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. शुभम हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. ‘तो’ गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, अकोट शहर पोलिसांनी शुभलला पुण्यातून ताब्यात घेतलं होते. त्याची या प्रकरणी जामिनावर सुटका झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »