शेतीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा : मंत्री अतुल सावे; वैजापूरच्या शेतकऱ्यांनी मंत्र्यासमोर मांडली व्यथा

छत्रपती संभाजीनगर :  वैजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभागाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. मंत्री अतुल सावे यांनी वैजापूर तालुक्याचा बुधवार, 24 सप्टेंबर रोजी दौरा करुन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

अतिवृष्टीमुळे तसेच नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी वैजापूर तालुक्यातील वीरगाव, भग्गाव, कापूस वडगाव आदी गावांना भेट दिली. यावेळी मंत्री सावे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनिल सावंत, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातील वीरगाव, भग्गाव, कापूस वडगाव आदी गावात झालेल्या जोरदार पावसामुळे मका, कापूस, सोयाबीन, तुर, भुईमुंग, कांदा, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतातील उभी पिके पिवळी पडत असून सोयाबीनच्या शेंगा, कापसाचे बोंड फुटले आहेत. शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतात सर्वत्र चिखल साचला असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मंत्री सावे यांच्या निदर्शनास आणून दिले. खरिप हंगामाचे पीक हातातून गेल्याने आगामी दसरा, दिवाळी कशी साजरी करायची तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे, खते कशी आणायची असा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी मंत्री सावे यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »