Home Voting in Buldhana District: जिल्ह्यातील ३ हजार ५६१ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

Home Voting in Buldhana District

Home Voting in Buldhana District:  कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या अनुषंगाने १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील  ३ हजार ५६१ दिव्यांग व जेष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Home Voting in Buldhana District

बुलढाणा :  कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या अनुषंगाने १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील  ३ हजार ५६१ दिव्यांग व जेष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने 85 वर्षाहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी १२ डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण केली. मतदानाची प्रक्रिया प्राप्त झालेल्या फॉर्मनुसार १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान मतदान पार पडले. वयोवृद्ध व दिव्यांगाच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधानसभानिहाय पथक स्थापित करण्यात आले होते. यापथकामध्ये मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलीस व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये दिव्यांग व वयोवृद्धांनी आपले मत नोंदविले. मतदान प्रक्रिया गोपनीयता पाळत मतपत्रिका घडी केल्यानंतर छोट्या लिफाफ्यांमध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

६४२ दिव्यांगांचे मतदान

जिल्ह्यातील सातही मतदार संघात एकूण 642 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मलकापुर येथे ७८, बुलढाण्यात ५८, चिखलीत १४४, सिंदखेड राजात ३४, मेहकरमध्ये सर्वाधिक १४९ , खामगाव येथे ७४, जळगाव जामोदमध्ये १०५ ,असे मिळून सातही मतदार संघासाठी ६४२ दिव्यांग मतदारांनी आपला हक्क बजावला.

मतदार संघ निहाय झालेले मतदान

मतदार संघ          –   मतदान
मलकापुर          –  ४००
बुलढाणा          – ३३३
चिखली           –  ५९०
सिं. राजा            –  ७३७
मेहकर             – ७३२
खामगाव         –  २७४
ज. जामोद       – ४९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »