श्री गणेश महासंघाच्या कार्यालयात गणपती बाप्पा विराजमान; पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आरती

छत्रपती संभाजीनगर :  गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर, यंदा होणारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्री गणेश चतुर्थी निमित्ताने जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयात गणपती बाप्पा बुधवार, 27 ऑगस्ट रोजी विराजमान झाले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.

खोकडपूरा येथील जिल्हा श्री गणेश महासंघाच्या कार्यालयात बंडू पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार, अशोक पटवर्धन, सचिन खैरे, राजेंद्र दानवे, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक, सुनील माने, प्रभाकर मते, राजेश मेहता, कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, महेश उबाळे, हरीश शिंदे, निनाद खोचे, विक्की जाधव, अजय कागडा, शिवा ठाकरे अविनाश जाधव अक्षय गायकवाड सोमवीर चव्हाण यांची उपस्थिती होती.

दरम्यान, श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यावर्षी एक झाड…. एक मंडळ ही संकल्पना राबवून गणेश भक्तांना झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले. गणपतीच्या प्रतिष्ठापने बरोबरच प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी केले होते. याप्रसंगी ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सचे संदीप कुलकर्णी, प्रसाद कस्तुरे, गोविंद कुलकर्णी, सायली पिल्ले, सोहराम काझी, मनोज जोशी कल्पेश काथार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »