Gangapur Crime News : मित्राची हत्या केल्यानंतर स्वत:च्या खूनाचा बनााव रचणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. स्वत:च्या खूनाचा बनाव रचण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार गंगापूर तालुक्यातील सारंगपूर येथे घडला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.
गंगापूर : मित्राची हत्या केल्यानंतर स्वत:च्या खूनाचा बनााव रचणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. स्वत:च्या खूनाचा बनाव रचण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार गंगापूर तालुक्यातील सारंगपूर येथे घडला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश रमेश माठे (20), रा. वझर ता. गंगापूर आणि किशोर रमेश बर्डे (23), रा. जुने वझर ता. गंगापूर अशी खूनाचा बनाव रचणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर अमोल शिवनाथ उघडे (17), रा. कदीम शहापूर, ता.गंगापूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गंगापूर तालुक्यातील सारंगपूर शिवारात 1 नोव्हेंबर रोजी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या खिशात असलेल्या पाकीटात पॅन कार्ड, आधार कार्ड असा दस्ताऐवज मिळून आला होता. आधार कार्ड व पॅन कार्डवरील नावावरुन तो मृतदेह महेश माठे याचा असल्याचा पोलिसांनी प्राथमिक निष्कर्ष काढला होता. परंतु, महेश माठे याच्या कुटुंबियांची संशयास्पद वागणूक पोलिसांना खटकत असल्याने पोलिसांनी सखोल तपास केला असता तो मृतदेह अमोल उघडे याचा असल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी मयत अमोल उघडे याची आई सुनिता शिवराम उघडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक सुनिल लांजेवार, गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक सतीश वाघ, गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड, सहाय्यक निरीक्षक पवन इंगळे, सुधीर मोटे, उपनिरीक्षक प्रमोद काळे, झोरे, पोलीस अंमलदार लहू थोटे, वाल्मिक निकम, रवि लोखंडे, नरेंद्र खंदारे, संतोष पाटील, अशोक वाघ, संजय तांदळे, योगेश तरमाळे, आनंद धाटेश्वर, जीवन घोलप, पोस्टे गंगापूर येथील मनोज घोडके, विजय नागरे, मनोज नवले, संदीप राठोड, राहूल पगारे, विठल जाधव, तुळशीराम गायकवाड यांनी केली.