युवकाच्या खून प्रकरणातील चार आरोपी अटकेत

बुलढाणा :  प्रेम प्रकरणातून २० वर्षीय युवकाच्या  हत्येच्या घटनेने  बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील चिखली रोडवरील एका कॉस्मेटीक दूकानाजवळ घडलेल्या या थरारानंतर गुन्ह्यातील चार आरोपींना काही तासातच ताब्यात शहर पोलिसांना यश आले आहे. तर दोघे फरार असल्याची माहिती आहे. 

बुलढाणा :  प्रेम प्रकरणातून २० वर्षीय युवकाच्या  हत्येच्या घटनेने  बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील चिखली रोडवरील एका कॉस्मेटीक दूकानाजवळ घडलेल्या या थरारानंतर गुन्ह्यातील चार आरोपींना काही तासातच ताब्यात शहर पोलिसांना यश आले आहे. तर दोघे फरार असल्याची माहिती आहे. 

सनी जाधव (१९ वर्ष) असे मृतक युवकाचे नाव असून, त्याच्या पोटात आरोपी देवराज माळी (१९ वर्ष)याने चाकूने वार करून हत्या केली होती. घटनेनंतर, मृत सनी जाधव याच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, देवराज माळी  (रा. भीलवाडा, जुना गाव), ऋषी गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात, शहर पोलिसांनी दोन पथके स्थापित करून शहर पोलीस ठाणे हद्दीतून आरोपी देवराज माळी याला प्रथम ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती घेतली असता, त्याचे सहकारी असलेले इतर चार जणांचा शोध पोलिसांनी घेतला. काही तासातच या सर्वांना अटक करण्यात आली.

दोन जण फरार

खून प्रकरणात देवराज माळी हा मुख्य आरोपी असून, घटनेवेळी त्याचे सहकारी मित्र देखील हजर होते. यातील चार जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, दोघे फरार होण्यास यशस्वी झाले आहे. पोलीस त्यांच्या मागावर असून शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी ठाणेदार रवि राठोड यांनी सांगितले. 

कारवाई पथक.. 

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रवि राठोड, सपोनि भरत चापाईतकर, सपोनि. प्रताप दत्तात्रय भोस, सपोनि. जयसिंग राजपुत, डी.बी. पथक प्रमुख पोउपनि. रवि मोरे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ. संदपि कायंदे, संतोष वाघ, महीला पोहेकॉ. सुनिता खंडारे, पोकॉ. युवराज शिंदे, विनोद बोरे, मनोज सोनुने, विशाल बनकर, दिपक चव्हाण तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ. राजु आडवे, पोकॉ. कैलास ठोंबरे, ऋषीकेश खंडेराव व पोहेकॉ. पंजाबराव साखरे, सुनिल जाधव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »