First list of 48 candidates announced by Congress : काँग्रेस पक्षाकडून एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय राजधानी असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघातून राहुल बोंद्रे मलकापूरमधून राजेश एकडे यांना संधी देण्यात आली आहे.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय राजधानी असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघातून राहुल बोंद्रे मलकापूरमधून राजेश एकडे यांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतलेल्या काँग्रेसने विधानसभेत मात्र काँग्रेसची उमेदवार यादी येण्यास विलंब केला. अजूनही अनेक जागांवरच उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.
काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.