dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून फटाके : अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या : सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नसली तरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जर आज अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे विलिनीकरणाचा हा विषय मागे पडला, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून पुन्हा एकदा राजकीय फटाके लागले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नसली तरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जर आज अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे विलिनीकरणाचा हा विषय मागे पडला, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून पुन्हा एकदा राजकीय फटाके लागले आहेत.

सुनील तटकरे म्हणाले, त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची नक्की चर्चा झाली होती. जर दादा असते, तर १२ फेब्रुवारी ही जी तारीख सांगितली जात होती, त्या दिवशी विलिनीकरण नक्की झाले असते. दादांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आणि त्यांनी ठरवलेल्या बाबींनुसार हे घडेल, हे निश्चित होते. हा विलिनीकरणाचा विषय पुढे का गेला नाही? यावर बोलताना तटकरे यांनी खंत व्यक्त केली. दादांच्या प्रखर इच्छाशक्तीमुळे हे विलिनीकरण पूर्णत्वास गेले असते. परंतु, दुर्दैवाने दादांच्या अपघाती निधनामुळे तो विषय त्या ठिकाणीच थांबला, असे तटकरे म्हणाले. सुनील तटकरे यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या पडद्यामागील घडामोडींवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी विलिनीकरणाचा नेमका काय आराखडा तयार केला होता आणि त्यात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश होता, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नेमकी आता भूमिका का बदलली :  रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक प्रश्न सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना विचारला आहे. अजित पवार हयात असते तर विलीनीकरण होणारच होतं हे आम्हीही सुरूवातीपासूनच सांगत होतो. अजितदादांची इच्छा विलीनीकरणाची कशासाठी होती तर आदरणीय शरद पवार हे या वयामध्ये आणि अजितदादा स्वतः हे एक राहिले पाहिजेत आणि पवार कुटुंबही एक झाले पाहिजे ही दादांची भूमिका होती. याचाच अर्थ अजितदादांची भूमिका ही भावनिक होती. तसेच अजितदादा हे सत्तेत राहणार होते की नव्हते दादांना आणि आम्हाला माहीत आहे. अजितदादा जाण्यापूर्वी ज्या कुठल्या निवडणुका झाल्या म्हणजे महापालिका किंवा जिल्हा परिषद असो दादा विरोधात लढले होते, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

‘10 तारखेनंतर एकत्र बसू’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यातील संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असे प्रफुल पटेल यांना सांगितले. त्यामुळे 10 तारखेनंतर नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top