वाशिम : शहरातील गणेश पेठ भागात गुरुवार १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास मंगेश जोशी यांच्या राहत्या घराला तसेच समर्थ बुक स्टोअरला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला दिल्यानंतर दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमन विभागाचे साईनाथ दिनकर सुरोशे (लीडिंग फायरमन) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद (रवी) सुरोशे, विजय कुलकर्णी व सागर निवलकर (वाहन चालक) तसेच फायरमन सागर बरेटी, ऋषिकेश कव्हर, तरबेज शेख, प्रतीक गोरे, शिवम चव्हाण, आदित्य झंवर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील उपयोगी साहित्य तसेच समर्थ बुक स्टोअरमधील काही पुस्तके जळून नुकसान झाले आहे. मात्र वेळेत आग आटोक्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती.