Fire in Sillod : सिल्लोडच्या डोंगरगाव येथील जिनिंगला आग

Fire at Jining in Dongargaon, Sillod

Fire in Sillod : छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथील डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या राजराजेश्वर कॉटन इंडस्ट्रीजला बुधवारी मध्यरात्री आग लागली. अग्निश्मन दलाच्या चार बंबच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्यात आली.

Fire at Jining in Dongargaon, Sillod
Fire at Jining in Dongargaon, Sillod

सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथील डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या राजराजेश्वर कॉटन इंडस्ट्रीजला बुधवारी मध्यरात्री आग लागली. अग्निश्मन दलाच्या चार बंबच्या साह्याने आग नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
बुधवारी मध्यरात्री कापसाच्या ढिगाराला लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले. आग विझवण्यासाठी नागरिकांनी टँकरच्या साह्याने शर्यतीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, भोकरदन, सिल्लोड येथील अग्निशमन दलाच्या मदतीने अखेर रात्री एकच्या दरम्यान आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून, या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »