अंढेरा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत, अंढेरा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला आहे.

अंढेरा : अंढेरा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत, अंढेरा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला आहे.शेतकऱ्यांची फसवणूक करणारे राजकीय नेते व सत्ताधारी सरकारवर फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले नाही. आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी धमकावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत असून काही आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. या विरोधात अंढेरा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत, अंढेरा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला आहे. राजकीय नेते व सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.