Earthquake tremors in Marathwada : मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या भागात आज (ता. 21 मार्च) सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सकाळी घडलेल्या या घटनेनंतर नागरिक घराच्या बाहेर आले.
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या भागात आज (ता. 21 मार्च) सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सकाळी घडलेल्या या घटनेनंतर नागरिक घराच्या बाहेर आले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकजण घाबरुन घराबाहेर आले. तर, नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे.
याआधी मार्चच्या पहिल्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के असल्याचे हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे. तर, विशेष म्हणजे मराठवाड्यात 1993 नंतरचे हे सर्वात मोठे धक्के असल्याचे माहिती मिळत आहे.
आखाडा बाळापूर ठरला भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू
हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत.
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के
नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज सकाळी सहा वाजून 8 मिनिटांनी आणि सहा वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने भितीने नागरिक घराबाहेर पडले. नांदेडच्या ‘सिडको-हडको’ परिसरात देखील सकाळी सहा वाजून 5 मि. ते सहा वाजून आठ मिनिटांदरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.