due to short circuit. Fire at Dr. Rathi’s house : डाबकी रोड परिसरातील गणेश नगर स्थित डॉ. दिनेश राठी यांच्या निवास स्थानाला आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे कारण समोर आले असून, सुदैवाने नर्सिंग होम बचावले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
अकोला : डाबकी रोड परिसरातील गणेश नगर स्थित डॉ. दिनेश राठी यांच्या निवास स्थानाला आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे कारण समोर आले असून, सुदैवाने नर्सिंग होम बचावले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.
डाबकी रोड वरील श्री गजानन महाराज मंदिर जवळ डॉ.दिनेश व डॉ. कविता राठी यांचे गुरुकृपा नर्सिंग होम आहे. याच इमारती मधे दुसऱ्या माळावर डॉ. राठी यांचे निवासस्थान आहे. सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरातील कॉम्प्युटर रूम मधे अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आणि किंमती साहित्य, पलंग, टेबल खुर्च्या तसेच ए सी, फॅन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. ही आग एवढी मोठी होती की, आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमनच्या तीन गाड्या पाणी लागले. डाबकी रोड परिसरातील नागरीक, डाबकी रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, महावितरण कंपनीचे कर्मचारी यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली आहे. घटनेची रितसर नोंद डॉ. राठी यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे केली आहे. सुरुवातीला ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटमुळे झाल्याची परिसरात वार्ता पसरली होती. मात्र विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे कारण समोर आले आहे.