वर्ल्ड कप विजयानंतर फटाके फोडण्यावरुन वाद, घारोड येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

खामगाव :  क्रिकेट सामन्यामध्ये भारताने न्युझिलंड विरुध्द फायनल मॅच जिंकल्याच्या आनंदात फोडलेल्या फटाक्यांमुळे दोन गटात उफाळलेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये परस्परविरोधी तक्रारीवरुन ८ जणांविरुध्द हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील घारोड येथे घडली.

       टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ८ मार्च रोजी अखेरचा सामना भारत विरुध्द न्युझीलंडमध्ये झाला. हा सामना भारताने जिंकला. त्यामुळे घारोड येथे रामकृष्ण महादेव दुतोंडे यांनी फटाके फोडले. यावरुन उद्भवलेल्या वादात रामकृष्ण महादेव दुतोंडे व इतरांसोबत गावातीलच अलताफ शहा रफीक शहा, तौशीफ शहा रफिक शहा, आसिफ शहा रज्जाक शहा, रफीक शहा गुलाब शहा यांनी वाद केला. तुम्ही फटाके का फोडले, या कारणावरुन उद्भवलेल्या या वादातून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत उपरोक्त आरोपींनी लोखंडी कुऱ्हाड डोक्यात मारुन रामकृष्ण दुतोंडे यांना गंभीर जखमी केले. अशा तक्रारीवरुन उपरोक्त चौघांविरुध्द हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर तौसिफ शहा रफीक शहा (२५) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ८ मार्चच्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान गोपाल वसंता दुतोंडे, गणेश वसंता दुतोंडे, एकनाथ दुतोंडे, रामकृष्ण महादेव दुतोंडे यांनी संगनमत करुन घराच्या जवळ फटाके फोडले. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजाने लहान मुलांना त्रास होत असल्याने उपरोक्त चौघांना फटाके फोडू नका, असे म्हटले असता त्यांनी लोखंडी रॉडने मारुन जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरुन उपरोक्त चारही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास हिवरखेड पोस्टेचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ प्रविण जाधव करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »