धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील धनगर समाज बांधवांनी बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला, व समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी मोर्चा काढत बुलडाणा – अजिंठा राज्य महार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

समाज बांधवांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर धावडा येथील धनगर वाड्यापासून निघालेला मोर्चा बुलढाणा- अजिंठा राज्य महामार्गावरील बस स्थानकावर पोहोचला. यावेळी आरक्षणाची मागणी करीत, घोषणा देत रस्ता रोको दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. एसटी प्रवर्गात समावेश करण्याचे शासनाने आश्वासन पूर्ण करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. या आंदोलनात धनगर बांधवांनी आपल्या मेंढ्या देखील रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. या आंदोलनामळ अजिंठा – बुलढाणा राज्य महामार्गावर दीड तास वाहतूक दोन्ही बाजूनी ठप्प झाली होती. यावेळी पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. हे निवेदन तहसीलदारांकडे पोहाचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या आंदोलनात धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.