Devendra Fadnavis : बंजारा समाज हितासाठी काढलेले विविध जिआर मुळे राज्य भरातील बंजारा समाज बांधव विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार यांना भरघोष मतदान केल्याने राज्यात एकहाती सत्ता आल्यामुळे पोहरागड येथील संत डॉ रामरावबापू समाधीस्थळाचे प्रमुख देविभक्त शेखर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्त्यांचा सत्कार केला.
मानोरा : महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व ना. संजय राठोड यांनी श्रीक्षेत्र पोहरागड व उमरीगड विकास कामा करिता दिलेला भरीव निधी, संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजना कार्यान्वित केली. यासाठी दिलेला निधी व बंजारा समाज हितासाठी काढलेले विविध जिआर मुळे राज्य भरातील बंजारा समाज बांधव विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार यांना भरघोष मतदान केल्याने राज्यात एकहाती सत्ता आल्यामुळे पोहरागड येथील संत डॉ रामरावबापू समाधीस्थळाचे प्रमुख देविभक्त शेखर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्त्यांचा सत्कार केला.
मुबंई येथील सागर बंगला येथे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची पोहरागडचे देविभक्त शेखर महाराज यांनी भेट घेऊन चर्चा केली. महायुती सरकारच्या काळात तीर्थक्षेत्र पोहरागड व उमरीगड करिता कधी नव्हे एवढा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व ना संजय राठोड यांनी दिला.त्यामुळे पोहरागड येथे विरासत ए बंजारा वास्तूसंग्रालय निर्माण कार्य पूर्ण होऊ शकले. त्या नंतर संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजना कार्यान्वित करून त्या वर १५० कोटी रुपयाची तरतूद केली. बंजारा समाजा करिता बार्टीच्या धरतीवर वनार्टी, स्वाधार योजना, बोगस धुसखोरी, केंद्रात बंजारा बोर्डची स्थापना आदी सह बंजारा समाज करिता आवश्यक जी आर काडून कामे मार्गी लावल्यामुळे विधानसभा निवडणुकीत बंजारा समाज भाजपा उमेदवार यांच्या पाठीशी भक्कम पणे उभा राहल्यामुळे भाजपा मित्र पक्षाला राज्यात घवघवीत यश प्राप्त झाल्याने महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिर्थक्षेत्र कामाला गती, बंजारा समाजाचा योथोचित सन्मान,समाजाचा मंत्री मंडळात समावेश, शिक्षण व रोजगार करिता योग्य नियोजन केले जाईल. असा शब्द यावेळी शेखर महाराज यांना दिला. यावेळी महंत कबीरदास महाराज, यशवंत महाराज, बुलढाणा जिल्ह्यातील महंत रायसिंग महाराज आदी उपस्थित होते.