Demand for EVM hacking : ईव्हिएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.
पुणे : ईव्हिएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.
आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे. मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आरोपी मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे एव्हिएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना फोन केला. त्यासाठी अडीच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागण्यात आले. या संदर्भात दानवेंना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.