बुलढाणा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने गुरूवार 10 एप्रील रोजी अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्यसंपादक सुरेश देवकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल शाल, श्रीफळ, महात्मा फुले यांची पगडी तसेच सन्मानपत्र देवून ‘ माजी आमदार समाजभूषण स्व.सखाराम अहेर गुरुजी सामाजिक कार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बुलढाणा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने गुरूवार 10 एप्रील रोजी स्थानिक मुठ्ठे ले -आऊट येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्यसंपादक सुरेश देवकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल शाल, श्रीफळ, महात्मा फुले यांची पगडी तसेच सन्मानपत्र देवून ‘ माजी आमदार समाजभूषण स्व.सखाराम अहेर गुरुजी सामाजिक कार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विचारपिठावर उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, पी.सी चौधरी, के.टी पांडव, सुधाकर अहेर, स्नेहलता मानकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सत्काराला उत्तर देतांना सुरेश देवकर म्हणाले, महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेवून त्यानुसार कार्य करत असतांना विविध सामाजिक संघटना आपल्या कार्याची दखल घेत असतात, असे असतांना पुरस्कार देणारे हात प्रामाणिक असले की पुरस्काराचे महत्त्व वाढते. माझ्या आजवरच्या प्रवासात या पुरस्काराचे महत्व खूप मोठे आहे, त्यामुळे मी हा पुरस्कार स्विकारला. विद्यार्थी दशेपासूनच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व माझे ऋणानुबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.