छत्रपती संभाजीनगर : पिस्तुलचा धाक दाखवून धमकावणाऱ्यास गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी दोन रिव्हॉल्वरसह सहा जिवंत काडतूसे असा एकूण 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अश्फाक शेख ईसाक (32 वर्ष), रा. लोकसेवा दुध डेअरी जवळ, शहा बाजार असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्र शैक्षणीक नियोजन व प्रशासन संस्थेच्या बाजुला बंद पडलेल्या ईमारती जवळ एक व्यक्ती त्याच्या ताब्यात असलेल्या पिस्तुलचा धाक दाखवून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना धमकावत असल्याची माहिती गुन्हेशाखेला 24 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मिळाली होती. गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रविण वाघ, पोलिस अंमलदार योगेश गुप्ता, विक्रम खंडागळे, संदीप तायडे, राजेश यदमळ, मनोज विखणकर, सोमकांत भालेराव, विजय निकम, अमोल मुगले, सोमनाथ डुकले आदींच्या पथकाने महाराष्ट्र शैक्षणीक नियोजन व प्रशासन संस्थेजवळ सापळा रचून शेख अश्फाक शेख ईसाक याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ दोन रिव्हॉल्वर, सहा जीवंत काडतूसे आदी मिळून 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पेालिस अंमलदार संदीप तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख अश्फाक शेख ईसाक याच्याविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.