छत्रपती संभाजीनगर : सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या अट्ल चोरट्यास पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी करण्यात आली असून चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या एक लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिस खान उर्फ बाबा खलील खान, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. शहागंज परिसरातून दुचाकी चोरणारा अनिस खान उर्फ बाबा हा किलेअर्क परिसरातील काळा दरवाजाजवळ आला असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाला मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सहाय्यक फौजदार मुनिर पठाण, पोलिस अंमलदार राजेंद्र साळुंके, बबन इप्पर, मनोहर त्रिभुवन, आनंद वाहुळ, घुगे, पवार, पाडवी आदींच्या पथकाने काळा दरवाज्याजवळ सापळा रचून अनिस खान उर्फ बाबा याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन आणि सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन अशा एकूण पाच दुचाकी चोरल्या असल्याची कबूली दिली.
पोलिसांनी अनिस खान उर्फ बाबा याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त संपत शिंदे, सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांच्या पथकाने केली.