घरगुती गॅससाठी नागरिकांची तारेवरची कसरत: जाफ्राबादला पाईपलाईन कंपनीकडून मात्र सर्रास वापर

कुंभारझरी : गॅस टंचाईच्या नावाखाली शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातील जनतेलाही त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे गॅस तुटवडा असल्याचे सांगत घरगुती गॅस सिलेंडर मिळणे अवघड झाले आहे, तर दुसरीकडे पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर सुरू केला आहे. हे चित्र सध्या जाफ्राबाद तालुक्यात बघायला मिळत आहे.

जागतिक युद्धाचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहे. गॅस टंचाईच्या नावाखाली नागरिकांना घर‍गुती सिलेंडरसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्यां हॉटेल व्यावसाायिक तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परंतु इकडे जाफ्राबाद तालुक्यात कुंभारझरी ते सिल्लोड पाईपलाईन मार्गावर उलट चित्र पहायला मिळत असून पाईपलाईन कटिंगसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचे दिसत आहे. ज्या कंपनीने हे काम घेतलेले आहे, त्या मेगा इंडस्ट्रीज कंपनीकडून सर्रासपणे घरगुती गॅसचा वापर केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना सध्या सहजपणे गॅस मिळत नाही, मात्र या कंपनीला गॅस उपलब्ध कुठून होतो, याचा शोध घेण्याची तसदी प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. संबंधित ठेकेदारावर व गॅस वितरण कंपनीला कोणाचा आर्शीवाद आहे की, काय असा सवाल या भागातील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. महिलांना या गॅसच्या तुटवड्यामुळे डोळ्याचे आजार होत आहे तसेच अनेक ठिकाणी गॅसअभावी हॉटेल देखील बंद झाले. तसेच लग्न समारंभ सुध्दा रद्द झालेले आहे. परंतु या कंपनीला गॅस कसे उपलब्ध होतोय असा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान याबाबत कंपनीच्या कामगारांकडे विचारणा केली असता, कोणतेही उत्तर मिळाले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »