Chhatrapati Sambhajinagar News: सरपंच, उपसरपंचासह 17 सदस्यांवर अपात्र

ग्राम पंचायत, वाळूज (छत्रपती संभाजीनगर)

Chhatrapati Sambhajinagar News : नियमबाह्य परवानगीमुळे अख्खी ग्रामपंचायतच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आली आहे. सरपंच उपसरपंच यांच्यासह 17 सदस्यांचा यात समावेश आहे.

ग्राम पंचायत, वाळूज (छत्रपती संभाजीनगर)
ग्राम पंचायत, वाळूज (छत्रपती संभाजीनगर)

वाळूज : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज ग्रामपंचायतला खासगी कंपनीला मोबाइल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिल्याचे प्रकरण जोरदार भोवले आहे. नियमबाह्य परवानगीमुळे अख्खी ग्रामपंचायतच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आली आहे. सरपंच उपसरपंच यांच्यासह 17 सदस्यांचा यात समावेश आहे.
जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन वर्षांपूर्वी वाळूजला फायबर केबल व नवीन मोबाईल टॉवर उभरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर ग्रामपंचायतने कंपनीला टॉवर उभारण्याची परवानगी दिली.
या विरोधात रहिवासी भैय्यासाहेब चव्हाण यांनी शाळेपासून शंभर मीटरच्या अंतरावर टॉवर उभरण्यास परवानगी देताना ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नाही अशी तक्रार विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्याकडे केली होती. विभागीय आयुक्तांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासह 17 सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »