Chhatrapati Sambhajinagar Crime News : विनापरवाना बेकायदेशिररित्या घरात शस्त्रांचा साठा करणाऱ्या तरुणास गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी गजाआड केले. रणजीत भगवानदास वैष्णव, रा.गल्ली नंबर 6, संजयनगर असे घरात शस्त्रसाठा ठेवणाऱ्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन तलवारी, एक कुकरी, आणि जांबिया अशी हत्यारे जप्त केली असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी कळविली आहे.
छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना बेकायदेशिररित्या घरात शस्त्रांचा साठा करणाऱ्या तरुणास गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी गजाआड केले. रणजीत भगवानदास वैष्णव, रा.गल्ली नंबर 6, संजयनगर असे घरात शस्त्रसाठा ठेवणाऱ्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन तलवारी, एक कुकरी, आणि जांबिया अशी हत्यारे जप्त केली असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी कळविली आहे.
गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे हे आपल्या पथकासह जिन्सी परिसरात सोमवारी गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, रणजीत वैष्णव याने आपल्या घरात धारदार तलवारी, एक कुकरी, जांबीया अशी शस्त्रास्त्रे ठेवली आहेत. उपनिरीक्षक बोडखे यांच्या पथकाने रात्री अकरा वाजेच्या सुमारास वैष्णव याच्या घरावर छापा मारला. पोलिसांनी रणजीत वैष्णव याला ताब्यात घेत, घराची झडती घेतली असता घरात दोन तलवारी, एक जांबिया, एक कुकरी अशी धारदार शस्त्रे मिळून आली. याप्रकरणी रणजीत वैष्णव याच्याविरुध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.