हेंडगे खून प्रकरणातील चव्हाण दांम्पत्यास पुण्यातून अटक: परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

परभणी :  मुलीची टिसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था चालक दांम्पत्याने मारहाण केली होती. पालकाचा मृत्यू झाल्यावर या प्रकरणी पूर्णा पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून संस्था चालक दांम्पत्य फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, 22 जुलै रोजी पहाटे चव्हाण दांम्पत्याला पुणे येथून अटक केली.

मयत जगन्नाथ पांडुरंग हेंडगे हे मुलीची टीसी आणण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शीयल शाळेत गेले होते. या ठिकाणी संस्था चालक प्रभाकर चव्हाण, त्यांच्या पत्नीने प्रवेशावेळीची उर्वरित रक्कम भरा, असे म्हणत वाद घालून मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या जगन्नाथ हेंडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी पुर्णा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून चव्हाण दांम्पत्य फरार झाले होते. पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक निरीक्षक पांडूरंग भारती, राजू मुत्तेपोड, उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, गोपीनाथ वाघमारे, पोलिस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, दुधाटे, रेड्डी, कौटकर आदींच्या पथकाने चव्हाण दांम्पत्याला पुण्यातून अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »