भूखंड विकून आ. संजय गायकवाड यांची शेतकर्‍यांना २५ लाखांची मदत

बुलढाणा :  राज्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे सरकारकडून मदतीची घोषणा झाली आहे. परंतू अद्याप मदत पोहचू शकलेली नाही. त्याामुळे शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे पुढे सरसावले आहे. स्वमालकीचे दोन भूखंड विकून आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाख रुपये दिले आहे.

मतदार संघात कुणाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत आमदार गायकवाड नेहमीच करीत असतात. यावेळी महाराष्ट्रावरचे संकट मोठे आहे. शेतातील पिके वाहून गेली, शेत जमिनी खरडून गेल्या, गुर्‍हे – ढोरे वाहून गेली व घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून आमदार गायकवाड यांनी एका महिन्याचे मानधन दिले आहे. तर मंगळवार ३० सप्टेंबर रोजी  आयोजित पत्रकार परिषदेत आ.गायकवाड यांनी बुलढाणा शहरातील त्यांचे सर्व्हे नं. ४४ मधील दोन भूखंड विकून त्यामधून आलेली २५ लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते विजय अंभोरे, गणेशसिंग राजपूत, अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड यांची उपस्थिती होती.

मदत तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले आहे की, ही मदत तात्काळ शेतकर्‍यांपर्यंत पोहचवा. सर्व उद्योजक, अभिनेते, राजकीय पक्षातील पदाधिकारी , विविध प्रतिष्ठाने, सरकारी नोकरदार, पतसंस्था व इतरांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवहनही आ. गायकवाड यांनी केले आहे. सरकारने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची आहे. कर्जमाफी करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत झाली पाहि,जे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ. गायकवाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »