warning of Manoj Jarange Patil : आता नाव घेतले नाही, मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल. यावेळेस फक्त पाडा म्हणलो, नाव घेतले नाही. विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : आता राजकारणात उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज मैदानात उतरेल. आता नाव घेतले नाही, मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल. यावेळेस फक्त पाडा म्हणलो, नाव घेतले नाही. विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी आज शनिवार 18 मे रोजी रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. अजून राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज मैदानात उतरेल असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले जरांगे पाटील?
पाच टप्प्यात निवडणूक होत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या. नाशिकमध्येही मी कुणाला पाठिंबा दिला नाही. अफवा पसरवल्या जात आहेत, असेही यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
सर्वांना विनंती आहे कीस भावनिक होऊ नका, आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा, आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी रहा. आपल्या लेकरांना जो न्याय देईल त्यालाच मतदान करा. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाय पडतील आणि पुन्हा विसरून जातील. मतामधून आपली ताकद दाखवा असे आवाहन ही यावेळी जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
नारायण गडची सभा रद्द झाली कारण तिथे तयारी नव्हती. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते अशीही माहिती जरांगे पाटील यांनी दिली.