dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आषाढी वारी करून परतणारी बस उलटली, वारकऱ्यांसह ३० प्रवासी जखमी 

बुलढाणा :  पंढरपूर येथून आषाढी वारी करून घराकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 30 वारकरी व प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही घटना सोमवारच्या पहाटे दोन वाजता चिखली जवळ महाबीज कार्यालयासमोर घडली. 

पंढरपूर येथून काही प्रवासी व वारकऱ्यांना घेऊन खामगाव कडे निघालेली पंढरपूर ते खामगाव ही बस सोमवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास खामगाव चिखली रोडवरील महाबीज कार्यालयाजवळ पोहोचली. येथे रस्त्यावरील दुभाजकावर आदळून बस उलटली. या भीषण अपघातात एसटी बस मधील वारकऱ्यांसह इतर प्रवासी असे 30 जण जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी वारकऱ्यांना बुलढाणा व चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बसमधून 51 प्रवासी प्रवास करीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top