अपघातानंतर बसला आग,  31 प्रवासी बचावले 

छञपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात असलेल्या साईराम ट्रॅव्हल्स बसला अपघात होऊन लागलेल्या आगीत एक प्रवासाचा मृत्यू झाला,  तर 31 प्रवासी सुदैवाने बचावले. अपघाताची ही घटना शुक्रवार , 2 जानेवारी रोजी पहाटे समृद्धी महामार्गावरील माळीवाड्यापासून  मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर घडला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

साईराम ट्रॅव्हल्स प्रवासी घेऊन मुंबईकडे समृद्धी महामार्गाने जात होती. माळीवाडा टोल नाका पार केल्यानंतर 15 ते 16 किलोमीटर अंतरावर ट्रॅव्हल्स बसणे समोर जाणाऱ्या एका वाहनाला धडक दिली.  त्यानंतर बसला आग लागून बसच्या एका चालकाचा मृत्यू झाला तर 31 प्रवासी बचावले . ट्रॅव्हल्स बसला आग लागल्याचे समजताच छत्रपती संभाजी नगर येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसला लागलेली आग विझवली, परंतु तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.  या घटनेतील जखमी प्रवाशांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »