Buldhana Voting: बुलढाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर दैनिक महा भूमीचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी कुटुंबियासह सकाळी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडले.
बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर दैनिक महा भूमीचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी कुटुंबियासह सकाळी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडले.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आपले मतदानाचे कर्तव्य उत्साहाने पार पाडत आहेत.सकाळपासूनच बुलढाणा शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती.