Buldhana vote counting: विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू आहे. मतमोजणी सुरू असून, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १५४ मतांनी आघाडी घेतली आहे.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू आहे. मतमोजणी सुरू असून, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १५४ मतांनी आघाडी घेतली आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच तिरंगी लढतीचे चित्र आहे. महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर, मनोज कायंदे रिंगणात आहेत. या मैत्रीपूर्ण लढतीत दुसऱ्या फेरी अखेर खेडेकर यांनी ३ हजार ५८६ मते घेतली आहे. तर, मनोज कायंदे यांना ९७६, तर आघाडीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना सर्वाधिक ३ हजार ५१५ मतांनी आघाडी घेतली आहे.