Buldhana polling: दुपारी 3 पर्यंत जिल्ह्यातील 10 लाख 13 हजार मतदारांनी बजावला हक्क

Buldhana polling

Buldhana polling: सकाळी कासवगतीने झालेले मतदान दुपारपर्यंत 47 टक्क्यांवर पोहचले. अर्थात मतदानाला बाहेर पडण्यासाठी अधिकाधिक मतदारांनी दुपारची वेळ पसंत केली.

Buldhana polling

बुलढाणा : सकाळी कासवगतीने झालेले मतदान दुपारपर्यंत 47 टक्क्यांवर पोहचले. अर्थात मतदानाला बाहेर पडण्यासाठी अधिकाधिक मतदारांनी दुपारची वेळ पसंत केली. नुकतेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 10 लाख 13 हजार 572 मतदारांनी हक्क बजावला.

जिल्ह्यातील सातही मतदार संघासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 47. 48 टक्के मतदान पूर्ण झाले. मेहकर मतदार संघात सर्वाधिक 51.80 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. मतदान करण्यासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3 पर्यंत 47 टक्के मतदान जिल्ह्यात पूर्ण झाले.

मतदार संघ निहाय झालेले मतदान

मलकापूर 131314
बुलढाणा 134023
चिखली 141707
सिं. राजा 156329
मेहकर 158473
खामगाव 152152
जळगाव जा 139574
एकूण : 1013572

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »