बुलढाणा : आधी आघाडी झाल्यानंतरही ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता. परंतु, आज 20 नोव्हेंबर रोजी वंचितकडून नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले नामांकन मागे घेण्यात आल्याने आघाडीसह विशेषतः कॉँग्रेसला सुखद धक्का मिळाला.

बुलढाणा : आधी आघाडी झाल्यानंतरही ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता. परिणामी, महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार असलेल्या कॉँग्रेसच्या काकस यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. मतविभाजनाचा तीव्र धोका असल्याने कॉँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. परंतु, आज 20 नोव्हेंबर रोजी वंचितकडून नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले नामांकन मागे घेण्यात आल्याने आघाडीसह विशेषतः कॉँग्रेसला सुखद धक्का मिळाला.
