शेतीच्या वादातून सख्ख्या भावावर चाकु हल्ला

बुलढाणा : शेतीच्या वादातून लहान भावाने मोठया भावावर चाकुने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना चिखली तालुक्यातील साकेगाव येथे घडली. 

बुलढाणा : शेतीच्या वादातून लहान भावाने मोठया भावावर चाकुने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना चिखली तालुक्यातील साकेगाव येथे घडली. भारत फकिरा इंगळे असे चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोठया भावाचे नाव असून त्यांच्यावर त्यांचा लहान भाऊ शरद फकिरा इंगळे याने चाकु हल्ला केला. या प्रकरणी आरोपीविरूध्द रायपूर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »