जालना : मंजूर घरकुलांचे दुसऱ्या हप्त्याचे पैसै खात्यावर जमा करण्यासाठी ६५ हजारांची लाच स्वीकारताना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन शालीवाहन कांबळे ( रा. आदर्श नगर, अंबड ) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवार, ३१ मे रोजी सायंकाळी उशिरा करण्यात आली. लाचेच्या प्रकरणात सामील असलेला संगणक ऑपरेटर रामदास मंडाळ हा फरार झाला आहे.

एसीबी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबड येथील एका तक्रारदाराने त्याचे नातेवाईक आणि गावातील इतर लाभार्थी असे १७ जणांच्या मंजूर झालेल्या घरकुलांच्या फाईली कार्यालयात दाखल केलेल्या होत्या. दरम्यान, मंजूर घरकुलांचे दुसऱ्या हप्त्याचे प्रत्येकी 70 हजार रुपये खात्यावर जमा करण्यासाठी पंचायत समितीमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन कांबळे, संगणक ऑपरेटर रामदास मंडाळ यांनी प्रत्येक फाईलसाठी पाच हजार प्रमाणे 85 हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छञपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
दरम्यान, एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता संगणक ऑपरेटर रामदास मंडाळ याने स्वतः साठी दीड हजार, गटविकास अधिकाऱ्यांसाठी दीड हजार आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन कांबळे याच्यासाठी 1 हजार रुपये याप्रमाणे पैसै मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कांबळे याने प्रत्येक फाईलसाठी 4 हजार याप्रमाणे 68 हजार रुपये गटविकास अधिकाऱ्यांना देण्यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर शनिवार, 31 मे रोजी सायंकाळी लाचेचा सापळा लावण्यात आला. यावेळी
तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 65 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सचिन कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी संगणक ऑपरेटर रामदास मंडाळ हा फरार झाला. त्याचा सोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी कांबळे याची अंगझडती घेण्यात आली असून त्याचा मोबाईल मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सापळा अधिकारी, पोलीस निरीक्षक विजय वगरे, सहाय्यक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक केशव दिंडे, पोलिस अंमलदार अशोक नागरगोजे, साईनाथ तोडकर, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.