BJP’s third list announced : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर मतदारसंघातून हरिष पिंपळे, तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून सई प्रकाश डहाके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर २२ उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपानं २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळं, भाजपानं १४६ उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचं दिसून आलं.