BJP’s second list announced : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने शनिवारी २२ उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात अकोला पश्चिम मतदारसंघातून विजय अग्रवाल यांची, तर अकोट मतदारसंघातून प्रकाश भारसाकडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने शनिवारी २२ उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात अकोला पश्चिम मतदारसंघातून विजय अग्रवाल यांची, तर अकोट मतदारसंघातून प्रकाश भारसाकडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपाने यापूर्वी ९९ उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत १२१ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजच्या दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे, प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
मलकापूरात सुखचैन संचेती, तर वाशिममध्ये श्याम खोडे यांना संधी
मलकापूर विधानसभा मतदारसंघातून सुखचैन संचेती, तर वाशिम मतदार संघातून श्याम खोडे यांच्या नावाची घोषणा भाजपाने आपल्या दुसऱ्या यादीतून केली आहे.