Assembly Elections 2024 : युती तोडली; संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार ५० जागा  – प्रदेश प्रवक्ते डॉ. भानुसे 

Assembly Elections 2024

Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजी ब्रिगेडला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती तुटली असून संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. राज्यात ५० पेक्षा अधिक उमेदवार देणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

Assembly Elections 2024

छत्रपती संभाजीनगर :  राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजी ब्रिगेडला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती तुटली असून संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. राज्यात ५० पेक्षा अधिक उमेदवार देणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

संभाजी ब्रिगेडने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, गंगाधर बनबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दोन वर्षापूर्वी शिवसेनेशी संभाजी ब्रिगेडची युती झाली होती. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेनेचा व महाविकास आघाडीचा प्रचार केला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विधानसभेच्या जागा वाटपात आम्हाला सन्मानपूर्वक स्थान दिले नाही, असे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. शिवसेना (उबाठा) बरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत. फॅसिस्ट शक्तींना संभाजी ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहील. लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लोकांचे प्रश्न, महामानवांचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. सुमारे ५० जागावर उमेदवार अर्ज भरणार आहेत. महायुतीची सनातन विषमता व आघाडीचे नकली पुरोगामित्व याविरोधात समाजमत तयार करण्याची गरज आहे, असे भानुसे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »