महापालिकेसाठी दोन दिवसांत तब्बल ३१७० अर्जाची विक्री

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसते आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १३५४ अर्ज इच्छुकांनी नेले. दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जाची विक्री झाली. एकेका उमेदवाराने दोन ते तीन अर्ज खरेदी केले. पुढील तीन ते चार दिवसांत अर्ज विक्रीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणूक २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्ग, आरक्षणाचा पेच आदी अनेक कारणांमुळे निवडणूक रखडत गेली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पाच वर्षे प्रशासकीय राजवट होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होत आहेत. २३ डिसेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू झाली. पहिल्याच दिवशी शहरातील नऊ निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून १८१६ अर्ज विक्रीला गेले. दुसऱ्या दिवशी १३५४ अर्ज गेल्याची माहिती देण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज विक्री करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उघडताच अर्ज घेण्यासाठी इच्छुक आणि त्यांचे समर्थक गर्दी करीत आहेत. सिल्लेखाना येथील महापालिका झोन कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »