MiG-29 plane crashed in Agra : भारतीय हवाई दलाचे मिग-29 हे लढाऊ विमान सोमवारी उत्तर प्रदेशातीलआग्रा येथे एका शेतात कोसळले. टेक ऑफ करत असताना विमानाला आग लागली. क्षणार्धातविमान आगीचा गोळा बनून मैदानात कोसळले.
आग्रा : भारतीय हवाई दलाचे मिग-29 हे लढाऊ विमान सोमवारी उत्तर प्रदेशातीलआग्रा येथे एका शेतात कोसळले. टेक ऑफ करत असताना विमानाला आग लागली. क्षणार्धातविमान आगीचा गोळा बनून मैदानात कोसळले. विमान जमिनीवर पडताच स्फोटही होऊ लागले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वैमानिक सुखरूप बाहेर पडल्याचेसूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले जाणार आहेत. सोशलमीडियावर प्रसारित झालेल्या छायाचित्रांमध्ये लढाऊ विमानातून ज्वाळा निघताना दिसतआहेत. यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी राजस्थानमधील बारमेर येथे भारतीय हवाई दलाचेमिग-29 लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले होते. मात्र, वैमानिक विमानातून सुखरूप बाहेर काढलाआणि या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. अग्निशमन दल अपघाताच्या ठिकाणीपोहोचले आहे. विमानातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, विमानावर पाण्याचीफवारणी करण्यात आली.अपघातानंतर विमानात स्फोट सुरूच हे लढाऊ विमान एका शेतात कोसळले. तोपर्यंत गावातील लोकही या ठिकाणीधावत आले. ते मदतीसाठी ओरडत होते. दरम्यान, विमानात स्फोट होऊ लागले. गावातील लोक आरडाओरडा करत स्वत:लावाचवण्यासाठी धावले. विमान अपघातानंतर, विमानाचे काही भाग सुमारे 1 किमीच्या त्रिज्येत शेतात पसरलेले दिसले.त्यात पायलटचे पॅराशूटही होते. गावातील लोकांनी हे भाग सुरक्षित केले आहेत. पोलिसआणि हवाई दल हे भाग आपल्या ताब्यात घेत आहेत. आता विमान अपघात कसा झाला? याबाबत तांत्रिक त्रुटी असल्याचे बोललेजात आहे.