Ambala accident : हरियाणातील अंबाला येथे शुक्रवारी पहाटे मिनीबस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एका सहा महिन्यांच्या मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. अंबाला छावणीजवळील मोहरा गावाजवळ हा अपघात झाला.
अंबाला : हरियाणातील अंबाला येथे शुक्रवारी पहाटे मिनीबस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एका सहा महिन्यांच्या मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. अंबाला छावणीजवळील मोहरा गावाजवळ हा अपघात झाला.
पोलिसांनी सांगितले की, मिनीबस उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून जम्मू-काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात सुमारे 30 जणांना घेऊन जात होती. अपघातात जखमी झालेले सर्वजण नातेवाईक असल्याचे त्यांनी सांगितले. या धडकेमुळे मिनीबसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मिनीबसमध्ये प्रवास करणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून प्रवाशांनी जखमींना बसमधून बाहेर काढले आणि नंतर पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळच्या दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वैष्णोदेवीचे दर्शन अधुरेच
ट्रक चालकाने आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व प्रवासी नातेवाईक असून ते गुरुवारी संध्याकाळी वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. परंतू या अपघातामुळे भाविकांचे वैष्णोदेवीचे दर्शन अधुरेच राहिले.