अंबादास दानवे यांनी पकडली भाजप सदस्याची कॉलर; पंचायत समिती सभापती निवडणुकीत राडा, तीन सदस्य पळवल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमादरम्यान मंगळवार, 10 मार्च रोजी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सदस्य पळवल्याचा आरोप करत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची भररस्त्यात कॉलर पकडली. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले 

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमादरम्यान मंगळवार, 10 मार्च रोजी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सदस्य पळवल्याचा आरोप करत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची भररस्त्यात कॉलर पकडली. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दानवे कार्यकर्त्यांसह हातात काठी घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर बसल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचे भवितव्य मंगळवारी ठरणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने ज्या पक्षाला अध्यक्षपद मिळेल, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली असल्याची चर्चा सुरु आहे. पैठण पंचायत समिती मात्र निर्विवादपणे शिवसेना (शिंदे गट) ताब्यात राहण्याचे संकेत आहेत. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती आिा उपसभापती निवडीच्या वेळी भाजपने शिवसेना (उबाठा) पक्षाचे तीन सदस्य पळवले असल्याचे समजताच विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ. बाळासाहेब थोरात यांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली. यावेळी अंबादास दानवे यांनी भाजपचे सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडत आमचे सदस्य कुठे आहेत ? अशी विचारणा केली. अचानकपणे झालेल्या या घटनेमुळे कल्याण गायकवाड हे काही काळ गोंधळून गेले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत कल्याण गायकवाड यांची अंबादास दानवे यांच्या तावडीतून सुटका केली.

आमचे सदस्य कुठे आहेत ?  असा जाब विचारत अंबादास दानवे यांनी भाजपचे सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली. शिवसेना (उबाठा) आणि भाजपचे कार्यकर्ते यावेळी समोरासमोर आले आणि एकच गोंधळ उडाला. दरम्यान दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले की, आमच्या तीन सदस्यांना भाजपने सत्तेची ताकद आणि पैशाचा वापर करून पळवले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून आम्ही हे सहन करणार नाही. या प्रकरणावर आपण लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »