प्रलंबित तीनही न.प. च्या 9 जागेसाठी मतदान शांततेत

खामगाव :  जिल्ह्यात पार पडलेल्या घाटाखालील पाचही नगर पालिकांच्या निवडणुकीचा निकाल रविवार 21 डिसेंबर रोजी काही तासातच जाहीर होणार असून तब्बल नऊ वर्षानंतर या नगर पालिकांना नवा कारभारी मिळणार आहे. तसेच खामगाव, जळगाव जा. आणि शेगाव येथील नगर पालिकेतील प्रलंबीत असलेल्या 9 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले असून रविवार रोजी सकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून लगेच निकाल जाहीर केले जाणार आहे.

          खामगाव नगरपालिकेतील रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 5 (अ), 7 (अ), 9 (ब) आणि 16 (ब) या चार जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला मतदानाची गती अतिशय संथ दिसून आली. मात्र, सकाळी 11 वाजतापासून मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. खामगाव शहरातील एकूण 18 मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासांत खामगावात केवळ 3.57 टक्के मतदान पार पडले. तसेच सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत एकुण 60.09 टक्के मतदान झाले. 17,147 मतदारांपैकी 10, 304 मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच शेगाव नगर पालिकेमधील प्रभाग क्रमांक 4 मधील अ आणि ब मध्येही शांततेत मतदान पार पडले. याठिकाणी एकुण 3679 मतदारांपैकी 2563 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी 69.66 टक्के इतकी आहे. याचबरोबर जळगाव जामोद नगर पालिकेतील तीन जागांसाठी सुध्दा मतदान प्रकिया शांततेत पार पडली असून याठिकाणीही प्रभाग क्रमांक 6 मधील अ आणि ब तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील ब  साठी मतदान पार पडले. यामध्ये दोन्ही प्रभागातील एकुण 4973 मतदारांपैकी 3258 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जळगाव जामोद मध्ये 65.53 टक्के मतदान पार पडले आहे. 21  डिसेंबर रोजी सकाळी निवडणूक विभागाकडून खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा आणि मलकापूर याठिकाणी 2 डिसेंबर रोजी तसेच  20 डिसेंबर रोजी प्रलंबीत प्रभागात  झालेल्या दोन्ही टप्प्यातील मतदानाची मोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. 2 डिसेंबर रोजी न.प. अध्यक्ष आणि नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या तुलनेत 20 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 9 जागांच्या निवडणुकीत मतदारांचा उत्साह ओसरल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »